वडिलांनी मुलाच्या अंगावर गरम पाणी टाकले, बाणेरमधील घटनेने खळबळ

दुरुस्तीसाठी आलेल्या पाणी तापविण्याच्या मशीनवर अंघोळीसाठी पाणी तापविण्यास ठेवल्याच्या रागातून वडिलांनी गरम झालेले पाणी अल्पवयीन मुलाच्या अंगावर टाकल्याची धक्कादायक घटना बाणेरमध्ये घडली. त्यामुळे मुलाचा पाय भाजला आहे.

याप्रकरणी संतराम बिराजदार (वय 38) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुलाची आई संगीता बिराजदार (वय 33) यांनी चतुशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नतेश बिराजदार (वय 16) असे भाजलेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिराजदार दाम्पत्य बाणेर परिसरात राहण्यास आहेत. संतराम इलेक्ट्रेशियन असून त्यांच्याकडे पाणी तापविण्याची मशीन दुरुस्तीसाठी आली होती.

संगीताने मशीनवर अंघोळीचे पाणी तापविण्यास ठेवले होते. त्यावेळी संतराम याने पाणी इथे कोणी ठेवले असे विचारले असता, संगीताने मुलाला अंघोळीसाठी पाणी ठेवल्याचे सांगितले. इथे पाणी ठेवू नका असे म्हणत संतरामने संगिताला शिवीगाळ केली.

त्यानंतर गरम झालेले पाणी मुलगा नतेश याच्या अंगावर टाकले. त्यामुळे मुलाच्या डाव्या पायाच्या मांडीला भाजले आहे. अधिक तपास चतुःशृंगी पोलीस करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या