जुन्या भांडणाच्या रागातून तरूणावर जीवघेणा हल्ला, टोळक्याविरूद्ध गुन्हा

जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करून गंभीररित्या जखमी केले. ही घटना 25 सप्टेंबरला रात्री दहाच्या सुमारास हिंगणे खुर्द परिसरात घडली आहे.

या प्रकरणी नीरज लक्ष्मण ढवळे, अतिश पवार, मोहन गोरे, अ‍ॅडी कांबळे, सुरज ढवळे यांच्यासह सात ते आठ जणांविरूद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ओम सदाफुले असे गंभीर जखमीचे नाव आहे. याप्रकरणी संतोष भगवान बर्गे यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम आणि नीरज यांच्या भावाची जुनमध्ये मारामारी झाली होती. त्याचा राग नीरजला असल्यामुळे त्यांनी ओमला हिंगणे खुर्द परिसरात गाठले. माझ्या भावाला मारता का, आज तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत साथीदारांच्या मदतीने बेदम मारहाण केली. त्याच्यावर कोयत्याने वार करून गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम तपास करीत आहेत.