पुण्यात मोठी घटना, जंगली महाराज रस्त्यावर मोठी गॅस गळती

पुण्यातल्या जंगली महाराज रस्त्यावर मोठी गॅस गळती झाली आहे. जंगली महाराज परिसरात रस्त्याचे काम सुरू असताना शिवम हॉटेलसमोर ही गॅस गळती झाली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे आजूबाजूची सगळी दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.