पुणे विभागात 95.07 टक्के धान्यवाटप – विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

421

पुणे विभागात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना माहे जून 2020 महिन्याचे नियमित मंजूर 66 हजार 574.22 मे.टन असून आज अखेर 66 हजार 493.46 मे टन (99.88 %) धान्याची उचल झालेली आहे. त्यापैकी नियमित धान्य वितरण 95.07 % आहे. याअंतर्गत एकूण 26.16 लाख लाभार्थ्यांना 63 हजार 295.63 मे.टन अन्नधान्याचे वाटप करण्यात आलेले आहे.

पुणे विभागात 5 जुलै 2020 रोजी एकूण 206 शिवभोजन केंद्र असून सर्व सुरू आहेत. यामध्ये 18 हजार 610 गरजूंनी लाभ घेतला आहे. दिनांक 5 जुलै 2020 रोजी 18 हजार 610 (80.56 टक्के) थाळयांचे वाटप झालेले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या