टोळक्याकडून तरुणाला मारहाण

320
fight
file photo

भांडण झालेले असतानाही तरुणाशी मैत्री कायम ठेवल्याने चारजणांच्या टोळक्याने एका तरुणाला मारहाण केली. या टोळक्याला समर्थ पोलिसांनी जेरबंद केले. ही घटना दोन दिवसांपूर्वी रात्री नाना पेठेतील राजेवाडीत घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.

प्रतीक राजेश खेत्रे (26), जय उर्फ चिंट्या विठ्ठल गोफणे (24), आकाश प्रकाश चव्हाण (28), गणेश ( 30, सर्व रा. पीएमसी इमारत, राजेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सतीश फाळके (26, रा. राजेवाडी, नाना पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सतीश आणि प्रतीक, जय, आकाश, गणेशसह मट्ट्या यांच्याशी मैत्री होती. मात्र, काही कारणामुळे चौघांचा मट्ट्याशी वाद झाला होता. त्यामुळे सतीशने मट्ट्याशी केलेली मैत्री न तोडल्याचा राग आल्यामुळे चौघांनी मिळून सतीशला मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याच्या डोक्यात खुर्ची मारली. त्यामुळे गंभीर जखमी झाल्याने सतीशला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. एन. होले अधिक तपास करीत आहेत. तसेच दुसऱ्या एका प्रकरणामध्ये जुन्या भांडणाच्या रागातून राजेवाडी परिसरात कोयते घेऊन दहशत माजविल्याप्रकरणी सात ते आठ जणाांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गोपी खेत्रे यांनी फिर्याद दिली.

आपली प्रतिक्रिया द्या