‘पहले देश फिर रेजिमंंट’, लेफ्टनंट जनरल आहुजा यांनी 248 जवानांना दिली शपथ

643

देशसेवेत आलेल्या जवानांनी ’पहले देश, फिर रेजिमेंट और आखिर मे खुद’ असा मंत्र पाळावा असे सांगत लेफ्टनंट जनरल देपिंदर सिंह आहुजा यांनी जवानांना देशनिष्ठेची शपथ दिली. देशसेवेचा मंत्र समोर ठेवून 36 आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

नगरच्या मेकॅनाईज्ड रेजिमेंटल सेंटरमधील (एमआयआरसी) 248 जवानांनी शनिवारी शानदार संचलन करत देशनिष्ठेची शपथ घेतली. त्यावेळी ते बोलत होते. एमआयआरसीची ही 427 वी तुकडी होती. हे जवान विशेष प्रशिक्षणासाठी रवाना होणार आहेत. प्रशिक्षणादरम्यान सर्वच क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरीबद्दल ले. जनरल आहूजा यांनी रिक्रुट शिवम सिंह याला जनरल सुंदरजी सुवर्णपदक, राम दयाल मूड याला जनरल केएल डिसुजा रौप्यपदक, तर दिनेश चंद याला जनरल सुंदरजी कांस्यपदक प्रदान केले.

आपली प्रतिक्रिया द्या