खुनाच्या प्रयत्नात फरार असलेल्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोटारीला पुढे जाऊ न दिल्याच्या रागातून टेम्पो चालकावर खुनी हल्ला करीत पसार झालेल्या दोघा आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 25 नोव्हेंबरमध्ये कात्रज चौकात घडली होती. आरोपींनी टेम्पो चालकाला बेदम मारहाण करीत पळ काढला होता.

तुषार ऊर्फे सोन्या कोळप्पा धोत्रे, वय 21 आणि शुभम ऊर्फे मोघ्या नंदु गुंजाळ, वय 19 अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आदिनाथ विश्वनाथ जाधव असे जखमीचे नाव असून त्यांनी तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी आदिनाथ हे 25 नोव्हेंबरला त्यांचा चाकी टेंम्पो घेऊन निघाले होते. कामानिमित्त ते कात्रज चौकात थांबले. त्यावेळी मोटार चालकाला पुढे जाऊ न दिल्याचा राग मनात धरुन त्याने फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याचे उद्देशाने डोक्यात वायपर रॉड डोक्यात मारला.
पाठीवर, डोळयाला मारुन जखमी केले आहे. त्यावेळी आदिनाथ यांना मारहाण करणारे संदिप नरसिंग चव्हाण, रा. धायरी गाव, त्याचे साथीदार शुभम गुंजाळ, तुषार धोत्रे, कृष्णा सोनकांबळे यांचेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दाखल गुन्हयातील पाहीजे आरोपी तुषार धोत्रे, शुभम गुंजाळ हे गुन्हा दाखल झाल्यापासुन त्यांचे अस्तीत्व लपवुन राहत होता. दरम्यान आरोपी तुषार धोत्रे, शुभम गुंजाळ हे नवले पुलाचे खालील बाजुस थांबले आहे अशी माहिती पोलीस अमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, यांना मिळाली . त्यानुसार पथकाने त्यांना ताब्यात घेत अटक केले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, एसीपी सुषमा चव्हाण, भारती विदयापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, उपनिरीक्षक धिरज गुप्ता,हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, शैलेश साठे, विश्वनाथ गोणे, चेतन गोरे, मंगेश पवार, निलेश ढमढेरे, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, राहुल तांबे, अशिष गायकवाड, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली.

मोटारीला पुढे जाऊ न दिल्याने टेम्पो चालकाला बेदम मारहाण करीत खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. – विजय कुंभार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे