
इमारतीच्या टेरेसवर दारू पिताना डिस्टर्ब केल्याचा राग आल्यामुळे मद्यपींच्या टोळक्याने तरूणाला मारहाण करून दात पाडल्याची घटना धनकवडीतील बालाजीनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी चिक्या तुपे (रा. बालाजीनगर) याच्यासह तिघांविरूद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप लक्ष्मण काथवटे (रा. बालाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास संदीप त्यांच्या इमारतीच्या टेरेसवर फिरत होते. त्यावेळी दुसNया इमारतीच्या टेरेसवर एकजण मित्रांसोबत दारू पित असताना त्यांना दिसून आले. त्यामुळे संदीप यांनी संबंधितांना तुम्ही इथे दारू पिण्यास का बसता असे विचारले. त्याचा राग आल्यामुळे दारू पिलेल्या तिघांनी संदीप यांना मारहाण केली. त्यांचा दात पाडून गंभीर जखमी केले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस तपास करीत आहेत.



























































