
आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पदाधिकाऱयांनी भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयातील काही अधिकाऱयांना हाताशी धरून मतदार याद्यांमध्ये फेरफार करून घेतल्याचा भंडाफोड महाविकास आघाडीने केला आहे. महापालिकेकडूनच माहिती अधिकारातून मिळालेल्या संवादांसह सीसीटीव्ही पुरावे पत्रकार परिषदेत सादर करत भाजपची व्होटचोरी उघडकीस आणली आहे. असाच प्रकार शहरात अन्य क्षेत्रिय कार्यालयांतही झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून भाजप पदाधिकारी क महापालिकेच्या अधिकाऱयांकर कडक कारकाई कराकी. तसेच पुन्हा पारदर्शीपणे मतदारयाद्या करण्याची मागणी महाविकास आघाडीने केली आहे.
महाविकास आघाडीतर्फे प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, माजी नगरसेवक संजय बालगुडे यांनी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त, पुण्याचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांना निवेदन दिले आहे. पत्रकार परिषदेस शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख गजानन थरकुडे, कायदेतज्ञ ऍड. असीम सरोदे, डॉ. विश्वंभर चौधरी, शहर काँग्रेसचे सरचिटणीस ऋषिकेश बालगुडे आदी उपस्थित होते.
बालगुडे म्हणाले, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्याच्या कक्षाला आतून कडी लावून तब्बल चार ते पाच तास भाजपचे पदाधिकारी मतदार याद्यांचे काम करत होते. याचे संवादासह सीसीटीव्ही फुटेज हाती आले आहे. त्यामध्ये भाजपचे माजी नगरसेवक अजय खेडेकर, भाजपचे पदाधिकारी नामदेव माळोदे यांच्यासह अन्य तीन कार्यकर्ते अधिकाऱयांना आपल्या प्रभागातील आपल्या विचाराची नसलेली मतदारांची नावे दुसऱया प्रभागात टाका तर, आपल्या सोयीची नावे प्रभागात घ्या अशा सूचना देत असल्याचे समोर आले आहे. भाजपच्या पदाधिकाऱयांनी इतरही मतदारसंघामध्ये अशाच प्रकारे अधिकाऱयांना हाताशी धरून मतदार याद्यांमध्ये फेरफार केल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे बालगुडे म्हणाले.
अधिकाऱ्यांची बांधिलकी नागरिकांशी – डॉ. चौधरी
अधिकारी होताना तुम्ही घेतलेल्या शपथे प्रमाणे तुमची बांधिलकी ही सामान्य नागरिकांशी आहे, भाजपशी नाही. वीस दिवस आधी तुम्ही गोपनीय याद्या फोडताच कशा? पुणे महापालिका भाजपमध्ये विलिन झाली हे आयुक्यांनी जाहीर करावं. चार-चार तास बसून मतदार याद्यांमध्ये बदल करता ही कुठली प्रक्रिया आहे, असा सवाल डॉ. विश्वंभर चौधरी यांनी केला.



























































