पुणे- नवविवाहितेची नदीत उडी मारून आत्महत्या

894
sunk_drawn

लग्नानंतर माहेरहून पैसे आणण्यासाठीच्या छळास कंटाळून नवविवाहितेने नदीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना पुणे येथील बोपोडीतील विरक्रांती चौकात घडली.

याप्रकरणी श्रीधर पिल्ले (वय 32 रा. बोपोडी ) याच्यासह आई-वडिलांविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिरुमला श्रीधर पिल्ले (वय 27, रा. बोपोडी ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. कृष्णा लंका (वय 57, रा. देहूरोड) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिरुमला आणि श्रीधर यांचे मार्च 2020 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांनी श्रीधर आणि त्याच्या आई-वडिलांनी तिरुमलाला माहेरुन पैसे आणण्यासाठी तगादा लावला होता. त्यांनी पैशांसाठी तिरुमलाचा शारीरिक व मानसिक छळ केला. त्यास कंटाळून तिरुमलाने नदीत उडी मारुन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक वैशाली सुळ अधिक तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या