खंडाळ्यात आढळली मानवी कवटी, हाडे

crime news new

खंडाळ्यातील कायरखळा शिकारामध्ये मानवी कवटी, हाड व साडी आढळल्याने खंडाळा परिसरात खळबळ उडाली आहे. बावडा येथील तेजस पकार हा युवक त्याच्या मित्रांसोबत कायरखळा परिसरात फिरायला गेला होता. यावेळी कारखाना शिकारातील ओढ्यामध्ये त्यांना मानवी कवटी, हाडे व साडी दिसून आली. त्यांनी खंडाळा पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक सुनील शेळके, पोलीस अंमलदार अमित चव्हाण, धीरज नेवसे व शिरवळ रेस्क्यू टीम तत्काळ घटनास्थळी पोहोचली. घटनास्थळी अतिशय अडचणीच्या ठिकाणी मानवी कवटी, हाडे व साडी पोलिसांना मिळून आली. आढळलेली हाडे व कवटी पुढील तपासासाठी डीएनए व इतर प्रक्रियेसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. याप्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.