
<<< अमोल निलाखे>>>
बारामती नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने मोठी चढाओढ निर्माण झाली आहे. अशात आता नगराध्यक्षपदी अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या नावाची चर्चा रंगू लागली आहे. त्याच वेळी शरद पवार गटाकडून मातब्बर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला जाईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच बारामती नगराध्यक्ष पदाच्या चर्चा झडू लागल्या आहेत. बारामती नगर परिषदेची तब्बल नऊ वर्षांनंतर निवडणूक होणार आहे. नगराध्यक्ष पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पद मिळवण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.




























































