Pune News – पुण्याच्या जांभूळवाडी पुलावर अपघात, सात ते आठ वाहने एकमेकांवर धडकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यात पुन्हा एकदा अपघाताची घटना समोर आली आहे. शनिवारी मध्यरात्री जांभूळवाडी पुलावर सुमारे सात ते आठ वाहने एकमेकांवर धडकली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. प्रशासनाने तातडीने कारवाई करत अपघातग्रस्त वाहने रस्त्यातून हटवली आणि वाहतूक पूर्ववत केली.

मिळालेल्या माहितीनुसार एका वाहनावरील नियंत्रण अचानक सुटल्याने ही घटना घडली. आणि ते इतर अनेक वाहनांमध्ये घुसल्याने हा अपघात झाला. धडक इतकी जोरदार होती की पुलाचा दुभाजक तुटला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा कुणीही जखमी झाले नाही. अपघातानंतर घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या अपघाताची चौकशी सुरू आहे.