डिलरशिप देण्याचे आमिष दाखवून केली 19 लाखांची फसवणूक

373

एम आर एफ कंपणीची डीलरसीप देतो म्हणून 19 लाख 75 हजार 800 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास गवळी हे इंटरनेटवर डीलरसीपची माहीतीचा शोध घेत असताना त्याला एम आर एफ टायर लीमीटेड ही वेबसाईट दिसली. त्याने सदर वेबटसाईट ओपन करुन मोबाईल नं 9088975086 वर संपर्क केला असता समोरील व्यक्तीने त्यास सांगितले की, ‘मी एम आर एफ कंपनीतुन अमोल चव्हाण बोलतोय. तुम्हाला एम आर एफ कंपणीची डिलरशिप पाहीजे असेल तर मी सांगतो त्याप्रमाणे कंपणीचे अकाऊट वर पैसे जमा करावे लागतील.’ तेव्हा फिर्यादीने आरोपीच्या सांगण्यावरून रजिस्टेशन फी, सेक्युरीटी डीपोझीट, प्रोडक्ट बुकींग, लायसन्स फी वगैरेची खोटी माहीती देऊन अकाउंट नं 3511101006440 व 3511101006437 वर डिसेंबर 2019 ते दिनांक 22/01/2020 रोजी पावेतो वेळोवेळी 19,75,800/- रुपये भरुन घेतले. त्यानंतर त्यांना कोणतीही डिलरशीप मिळवून दिली नाही. त्यांचे पैसेही परत दिले नाहीत. गवळी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलिसांनी आरोपी अमोल चव्हाण याच्या विरुद्ध कलम 65/2020 भा.द.वि कलम 420 सह माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम 2008 चे कलम 66(D) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अटक करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या