शटर उचकटून चोरी करणाऱ्या सराईतांना अटक; 8 गुन्हे उघडकीस, चतुःशृंगी पोलिसांनी कामगिरी

396

पुणे शहरातील विविध भागात दुकानांचे शटर उचकटून चोरी करणाऱ्या दोघा सराईतांना चतुःशृंगी पोलिसांनी अटक केले आहे. त्यांच्याकडून एक दुचाकीसह 60 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्याशिवाय 8 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. विकास उर्फ जंगल्या उर्फ विकी दिलीप कांबळे आणि सर्फराज उर्फ रावण ताज शेख अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात मागील आठ ते नऊ महिन्यांपासून दुकानांचे शटर उचकटून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. चोरटे तोंडाला मास्क, हॅडग्लोज, रेनकोट, टोपी घालून चोरी करीत असल्यामुळे त्यांचा मागमूस लागत नव्हता. यासंदर्भात शटर उचकटून चोरी करणाऱ्या सराईतांना अटक; 8 गुन्हे उघडकीस, चतुःशृंगी पोलिसांनी कामगिरीपोलीस तपास पथकातील प्रकाश आव्हाड आणि तेजस चोपडे यांनी अत्यंत कुशलतेने सीसीटीव्हीचे फुटेज तपासून चोरी करणाऱ्या सराईतांची माहिती काढली. संबंधित चोरटे सराईत तडीपार असून पिंपरीमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तब्बल दोन किलोमीटरचा पाठलाग करुन विकास उर्फ जंगल्या आणि सर्फराज उर्फ रावणला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी चतुःशृंगी, येरवडा, कोरेगाव पार्क, पिंपरी-चिंचवड याठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याविरुद्ध खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, लुटमार, मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलीस उपायुक्तांनी शब्द खरा केला

चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शटर उचकटून 17 ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे दलात चतुःशृंगी पोलिसांच्या कामगिरीवर चर्चा रंगल्या होत्या. त्यापार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त पंकज देशमुख यांनी तपासाची सुत्रे हातात घेतली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज, खबऱ्याचे नेटवर्क चोरट्यांच्या हालचालींवरुन 10 दिवसांमध्ये त्यांच्या मुस्क्या आवळल्या आहेत. त्यामुळे चोरट्यांना पकडण्याचा दिलेला शब्द त्यांनी खरा केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या