आजपासून वाहतूक विभागातील सर्व परवानग्या ऑनलाईन

वाहतूक विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सर्व परवानग्या आता ऑनलाईनरित्या देण्यात येणार आहे. पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी बुधवारी ऑनलाईनरित्या उपक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, वाहतूक विभागाचे अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अशोक मोराळे, अनिल पाटील उपस्थित होते.

शहरातंर्गत विविध विकासकामे करताना वाहतूक विभागाची परवानगी घ्यावी लागते. त्यामध्ये रस्ते खोदाई, वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांची केबल टाकणे, महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येणारी कामे, रिक्षाचालकांचा बॅचचा समावेश आहे. संबंधित कामकाजासाठी नागरिकांना वाहतूक विभागाकडे जावे लागत होते. नागरिकांचा वेळ वाचविण्यासाठी वाहतूक विभागाने पुणे एनओसी डॉट इन नावाची वेबसाईट तयार केली आहे. त्याद्वारे नागरिकांनी इंत्भूत माहिती जमा केल्यानंतर तीन दिवसांनंतर ऑनलाईन परवानगी दिली जाणार आहे. त्यामध्ये तीन महिन्यांपर्यंत कामकाजाचा समावेश करण्यात आला आहे. कामाचा कालावधी जास्त असल्यास संबंधित विभागाची दर आठवड्याला बैठक घेउन आढावा घेतला जाणार आहे. वाहतूक विभागाकडून सर्व परवानग्या ऑनलाईन करण्यात आल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे वाहतूक विभागात परवानग्यासाठी लागणारी रांगा संपुष्टात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या