पुणे – नऱ्हे येथे ट्रक पलटी, रस्त्यावर पसरले भले मोठे पेपर रोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>चंद्रकांत पालकर, पुणे

पुण्यातील नऱ्हे भागातून भरधाव वेगाने जाणारा एक ट्रक अचानक पलटी झाला. यामुळे ट्रकमध्ये असलेले पेपर रोल रस्त्यावर पसरले. यामुळे या भागातून होणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

truck

सोमवारी सकाळी 9:15 च्या सुमारास हा अपघात घडल्याचे कळते.

vrl-truck

पेपर रोल घेऊन जाणारा VRL लॉजीस्टिकचा KA 25- C 7197 एक ट्रक मुख्य रस्तासोडून थेट खालच्या भागात असलेल्या सर्व्हिस रोडवर पलटी झाला.

truck-new

या घटनेत कुणी जखमी झाल्याची माहिती अजून तरी समोर आलेली नाही. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अपघाताचा तपास करत आहेत.

vrl-truck-accident