ट्रक जळीत प्रकरण; तक्रारदारच निघाला आरोपी

382

श्रीगोंदा तालुक्यातील चिखली घाटात मागील आठवड्यात एक कापसाने भरलेला ट्रक जळीत प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेच्या तपासाची चक्रे फिरताच या प्रकरणात चक्क फिर्यादीच आरोपी निघाला असल्याने पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कापसाने भरलेला ट्रक जळल्या प्रकरणी शाहरुख सिजाउद्दीन मन्सुरी यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांच्या तपासाची चक्रे फिरू लागली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता जळीत ट्रकचा चालक व मालक शाहरुख मान्सुरी हा काही गोष्टी लपवत असल्याचे तसेच कापूस जळण्यासाठी मोठा अवधी लागत असतो, अश्या अनेक गोष्टी पोलिसांच्या लक्षात आल्यावर पोलिसांनी फिर्यादी शाहरुख यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्याने घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणात सेंधवा मध्यप्रेदश येथील त्यांचा साथीदार शाहरुख क्युम मन्सुरी याने सांगितले की, ‘तू रिकामा ट्रक जाळून टाक तुला 2 लाख रुपये देऊन ट्रक जळीतचा इन्शुरन्स करून देतो’, असे सांगितल्यावर शाहरुख मन्सुरी याने गाडी जाळण्याचा आगोदर ट्रक मधील कापसाचे गठन दुसऱ्या गाडीमध्ये भरून ह्या ट्रकमध्ये कागदाचे तुकडे भरून ट्रक फिर्यादीच्या ताब्यात दिली. त्यानंतर फिर्यादीने पेट्रोल टाकून ट्रक चिखली घाटात पेटवून दिला असल्याची कबुली फिर्यादीने दिली.

आपली प्रतिक्रिया द्या