येरवडा कारागृहातून कैदी पळाला

506

येरवडा खुल्या कारागृहातून एक कैदी पळून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास खुले कारागृहात घडली. संजय रामजित भुईया असे पळालेल्या कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई हेमंत पाटील यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा खुले जिल्हा कारागृहात 20 सप्टेंबरमध्ये संजयला शिक्षा भोगण्यासाठी वर्ग करण्यात आले होते. शुक्रवारी पावणे सहाच्या सुमारास कारागृह प्रशासनाने बंदिवान मोजताना संजय आढळून आला नाही. त्याची कारागृहात आणि आजूबाजूच्या जंगल परिसरात शोधाशोध केली. मात्र, तो मिळून आला नाही. उर्वरित शिक्षा टाळण्यासाठी संजयने कारागृहातून पळ काढल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार शनिवारी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमोल वाघमारे अधिक तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या