कोंबड्यांची झुंज रोखायला गेलेल्या पोलिसांना मारहाण

711

हरियाणाच्या विधानसभा मतदारसंघातील लहरवाडी गावात कोंबड्याच्या झुंजी लावल्या जात आहे, याची माहिती मिळताच कोंबड्यांची झुंज रोखण्यासाठी गेलेल्या पोलीस आणि झुंज पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमध्ये हाणामारी झाली. यावेळी पोलिसांनी कोणाची धरपकड केली नाही, मात्र दोन दुचाकी आणि दोन कार घटनास्थळावर जप्त करण्यात आली आहे.

पुन्हाना विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात कोंबड्यांची झुंज लावून मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातो. हा प्रकार रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच सट्टा खेळणाऱ्यांनी जबर मारहाण केली. तसेच उपस्थित सट्टे लावणाऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांच्या गाडीचीही नुकसान केले. तर एका पोलिसाची वर्दीही फाडली. या घटनेत दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पुन्हाना पोलिसांनी 24 आरोपींसहित इतर 250 लोकांवरही विविध कलम लावण्यात आले आहे.

पुन्हाना पोलीस स्थानकाचे प्रभारी रामदयाळ यांनी सांगितले की, या प्रकरणात आरोपी भूरा, रत्ती, रफीक, अरशद, रहीम, इरफान, हाकम, इमरान, इन्नूस, नासिर, हकीकत, बूचा, सलीम, मुस्ताक यांच्यासहित 250 लोकांवरही जुगार प्रतिबंध कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध सुरु असून लवकरच त्यांना अटक करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या