पंजाब राफेल रस्त्यावर धावलं, आर्किटेक्टच्या भन्नाट कल्पनेला बालकांचा प्रतिसाद

punjab-rafael

भठिंडातील एका आर्किटेक्टने फायटर जेट सारखं दिसणारं एक वाहन तयार केलं आहे. त्याला ‘पंजाब राफेल’ असं नाव दिलं आहे. त्याच्या पंजाब राफेलची सध्या जोरदार चर्चा आहे. अनेक जण हे वाहन पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.

रामपाल बेहनीवाल हे भठिंडा येथे राहतात. त्यांनी एक नवीन आकाराचं वाहन तयार केलं आहे. हे वाहन फायटर जेटच्या आकाराचं आहे. या वाहनाला त्यांनी ‘पंजाब राफेल’ नाव दिलं आहे. “टीव्हीत राफेल पाहिल्यावर मला एक कल्पना सुचली आणि तेव्हा पासून मी असं वाहन तयार करण्याचा ध्यास घेतला होता. हे वाहन बनवण्यास दीड महिना लागला आणि 2.5-3 लाख रु. खर्च आतापर्यंत झाला आहे. या वाहनाचा वेग 15-20 किमी आहे.”, अशी माहिती त्यांनी एएनआयसोबत बोलताना दिली.

हे वाहन पाहयला सध्या गर्दी होते. विशेष म्हणजे लहान मुलांना हे वाहन खूप आवडते आहे. त्यांना याबद्दल जास्त आकर्षण असल्याचं सांगण्यात येत आहे.

जे लोक पैशांअभावी विमान प्रवास करू शकत नाही, किंवा लढाऊ विमानांचा आनंद सहजासहजी कुणाला मिळू शकत नाही त्यांच्यासाठी हे वाहन बनवण्यात आलं आहे,अशी माहिती त्यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या