सिंधूने ‘जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीप’ जिंकली, स्पर्धा जिंकणारी पहिली हिंदुस्थानी खेळाडू

891

हिंदुस्थानची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनं रविवारी इतिहास रचला. जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत विजय मिळवत सिंधूने सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. अंतिम फेरीमध्ये सिंधूने जपानची नोजोमी ओकुहारा हिचा 21-7, 21-7 अशा दोन सरळ सेटमध्ये धुव्वा उडवला. जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीपवर विजयी मोहोर उमटवणारी सिंधू पहिली हिंदुस्थानी खेळाडू आहे.

याआधी शनिवारी पी. व्ही. सिंधूनं चीनच्या चेन यू फेई हिचा 21-7, 21-14 अशी पराभव करत सहज विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अंतिम फेरीत सिंधूपुढे जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असणाऱ्या जपानच्या नोजोमी ओकुहारा हिचे आव्हान होते. हे आव्हान सिंधूने लिलया मोडीत काढले आणि विजय मिळवला.

फक्त 37 मिनिटात केले चित
अंतिम फेरीत सिंधूच्या झंझावातापुढे जपानच्या ओकुहारा हिचा निभाव लागू शकला नाही. सिंधूने फक्त 37 मिनिटांमध्ये तिला पराभूत केले. पहिल्या सेटमध्ये सिंधूनं सुरुवातीला आक्रमक खेळ करीत आघाडी घेतली. पहिला सेट 21-7 असा जिंकल्यानंतर ओकुहारा सिंधूला दुसऱ्या सेटमध्ये चांगले उत्तर देईल अशी चाहत्यांना आशा होती. परंतु सिंधूनं स्मॅश आणि जबरदस्त कोर्ट कव्हरेज खेळत दुसरा सेट आणि सामनाही आपल्या नावावर केला.

आपली प्रतिक्रिया द्या