जाणून घ्या क्यूआर 678 थेरपीविषयी

हल्ली केसगळतीच्या रुग्णांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. बदलती जीवनशैली, प्रदूषण, ताणतणाव, केसांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, थायरॉईड, हॉर्मोन्सचे असंतुलन आदी गोष्टी केसगळतीस कारणीभूत ठरतात. तसेच कोणत्याही धोकादायक प्रक्रियेविना केसांची वाढ कशी करता येईल हा एक मोठा प्रश्न आहे. टक्कल पडणे थांबविणे, हेअर फोलिकल्स बरे करणे आणि केस गळणे थांबविणे ही एक वेदनारहित पद्धत आहे. क्यूआर 678 पेप्टाईड्स, सजीवांच्या शरीरात निर्माण होणारे द्रव्य, पोषक द्रव्ये आणि खनिजे यांचे मिश्रण आहे, जे थेट टाळूमध्ये इंजेक्ट केले जाते. क्यूआर 678 हे फॉलिकल्सला आवश्यक पोषण देते आणि केसांच्या मुळांना घट्ट करून निरोगी केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरते. ते केसांची मुळे व केसांच्या पेशी समृद्ध करण्यासाठी रुग्णाच्या रक्तातील रिच प्लेटलेटचा, (प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी) वेदनारहीत उपचार पद्धतीचा वापर करतात.

तरुण मुलांमध्ये टक्कल पडण्यामागचे तसेच लवकर केस गळण्यामागचे मूळ कारण म्हणजे वेळीच या समस्येकडे लक्ष न देणे होय. बदलत्या जीवनशैलीमुळे हल्ली विशीतील तरुणींमध्येही टक्कल पडण्यासारखी गंभीर समस्या आढळून आल्याचे वक्तव्य डॉक्टरांनी केले आहे. डॉ. कपूर पुढे सांगतात हल्ली स्त्र्ााr-पुरुषांना वाढती स्पर्धा, भीती, चिंता, ताणतणाव आणि चुकीच्या आहार-विहाराच्या सवयी यामुळे केसगळतीची समस्या सारखी सतावत असल्याचे दिसून येते, तर थायरॉईड हॉर्मोन्सची पातळी कमी होणे किंवा विशिष्ट औषधांचा दुष्परिणाम, केसांच्या स्टाईलिंग उत्पादनांचा अतिवापर, केस रंगविण्याकरिता रासायनिक उत्पादनांचा अतिजास्त प्रमाणात वापर, जेल यांचा वापर आणि कौटुंबिक इतिहास पाहता अनुवांशिकरीत्यादेखील केसगळतीची समस्या उद्भवू शकते. या समस्येकडे दुर्लक्ष न करता उपचार सुरू करण्यासाठी त्वचारोगतज्ञांना भेट देणे आणि त्यांच्या सल्ल्यानुसार अचूक उपचार करणे योग्य राहील.

678 केस प्रत्यारोपण थेरपी आता वरदान ठरत आहे. शून्य दुष्परिणामांसह 100 टक्के यशदर, सुरक्षा आणि सामान्य केस प्रत्यारोपणापेक्षा 50 टक्के जास्त कार्यक्षमता. क्यूआर 678 केस प्रत्यारोपणाचा वापर फोलिक्युलर युनिट ट्रान्सप्लॅण्टेशन (एफयूटी) आणि फोलिक्युलर युनिट एक्स्ट्रक्शन (एफयूई) या दोन्ही प्रकारच्या केसांच्या प्रत्यारोपणासह केला जाऊ शकतो. क्यूआर 678 केस प्रत्यारोपण करताना काढण्यात येणारे हेअर फॉलिक्लस चांगल्या परिणामांसाठी यूएसए पेटंट 678 सोल्युशनमध्ये बुडवल्या जातात.

क्यूआर 678 केस प्रत्यारोपण ही नवी आणि सर्वात प्रगत प्रक्रिया आहे. सामान्य केस प्रत्यारोपणाच्या तुलनेत हे कार्यक्षम आहे आणि चांगल्या परिणामांची हमी देते. डॉ. देबराज शोम, (कॉस्मेटिक सर्जन आणि संचालक, एस्थेटिक क्लिनिक), डॉ. रिंकी कपूर (त्वचाविकारतज्ञ)

आपली प्रतिक्रिया द्या