
हिंदुस्थानी क्रिकेटपटू आर अश्विननेही आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. आर अश्विनने आज (27 आगस्ट) आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली. आयपीएल क्रिकेटर म्हणून माझा काळ आज संपत आहे असे म्हणत त्याने सर्वांनाच धक्का दिला. CSK सोबत झालेल्या तडकाफडकी वादानंतर त्याने IPL मधून तडकाफडकी निवृत्ती घेतली, त्यामुळे त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.
त्याने निवृत्तीची घोषणा करणारी एक पोस्ट X वर शेअर केली आहे. यात त्याने असे म्हटले की, “आज माझी आयपीएल कारकीर्दही संपत आहे.” त्याच्या १६ वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीत, अश्विनने एकूण २२१ सामने खेळले. त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये ५ संघांचे प्रतिनिधित्व केले.
डिसेंबर २०२४ मध्ये तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. आर अश्विनने २००९ मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो रायझिंग पुणे सुपरजायंट्स, पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि नंतर राजस्थान रॉयल्सकडून खेळला. गेल्या हंगामात (आयपीएल २०२५) तो चेन्नई सुपर किंग्जमध्ये परतला, ज्यामध्ये खेळल्यानंतर त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
Special day and hence a special beginning.
They say every ending will have a new start, my time as an IPL cricketer comes to a close today, but my time as an explorer of the game around various leagues begins today🤓.
Would like to thank all the franchisees for all the…
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) August 27, 2025
आयपीएलमधून निवृत्ती जाहीर करताना अश्विनने सोशल मीडियावर लिहिले, “खास दिवस आणि एक खास सुरुवात. असे म्हटले जाते की, प्रत्येक शेवटाची एक नवीन सुरुवात असते, आयपीएल क्रिकेटर म्हणून माझी वेळ आज संपत आहे, परंतु वेगवेगळ्या लीगमध्ये खेळाचा शोध घेणारा म्हणून माझा वेळ आजपासून सुरू होत आहे.
अश्विनने त्याच्या पोस्टमध्ये त्याच्या सर्व लीगचे आभार मानले, ज्यांच्यासाठी तो आयपीएलमध्ये खेळला. त्याने लिहिले, “गेल्या काही वर्षातल्या अद्भुत आठवणी आणि नातेसंबंधांबद्दल सर्व फ्रँचायझींचे आभार मानू इच्छितो. आणि आतापर्यंत बीसीसीआय आणि आयपीएलने मला जे काही दिले आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. पुढे जे काही आहे त्याचा आनंद घेण्यासाठी आणि त्याचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी उत्सुक आहे.”
अश्विन आयपीएलमध्ये ५ संघांसाठी खेळला आहे. त्याचा आयपीएल प्रवास २००९ मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून सुरू झाला. पहिल्या हंगामात तो फक्त २ सामने खेळू शकला. त्याच्या शेवटच्या आयपीएल हंगामात (२०२५), त्याने सीएसकेसाठी ९ सामने खेळले, ज्यामध्ये त्याने ७ विकेट घेतल्या होत्या.