‘रामबाण’ राफेल, हिंदुस्थानच्या ताफ्यात पहिले विमान

367

युद्धात निर्णायक, अमोघ शस्त्र म्हणून ओळखले जाणारे पहिले अत्याधुनिक राफेल लढाऊ विमान मंगळवारी फ्रान्सने हिंदुस्थानकडे सोपवले. विजयादशमीच्या मुहूर्तावर मिळालेले राफेल नावाचे हे ‘रामबाण’ शस्त्र पाकिस्तान, चीनसारख्या रावणांवर भारी पडणार आहे. हिंदुस्थानने फ्रान्सबरोबर 36 राफेल विमानांच्या खरेदीचा करार केला आहे त्यातले हे पहिले विमान आहे.

फ्रान्सच्या तीन दिवसांच्या दौर्‍यावर असलेले संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज ते औपचारिकपणे ताब्यात घेतले. त्या आधी त्यांनी राफेलची विधिवत पूजा केली. त्यानंतर संरक्षणमंत्री सिंह यांनी राफेलमधून उड्डाण केले. दरम्यान, हिंदुस्थानी हवाई दलाची ताकद अनेक पटींनी वाढेल, असा विश्वास संरक्षणमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

हे सहा बदल होणार

 • इस्रायली हेल्मेटट माऊंटेड डिस्ले
 • रडार वॉर्निंग रिसिव्हर्स
 • लो बॅण्ड जॅमर्स
 • 10 तासांचा फ्लाईट डेटा रेकॉर्डिंग सिस्टम
 • इफ्रा रेड सर्च
 • ट्रकिंग सिस्टम

राफेलची वैशिष्ट्ये

 • राफेल सगळ्याच हवामानात वापरता येणार असल्यामुळे सगळ्याच हवाई मोहिमांत ते वापरले जाऊ शकते.
 • मल्टिरोल फायटर एअरक्राफ्ट म्हणून ओळखले जाणारे हे विमान एका मिनिटात 60 हजार फुटांपर्यंत जाऊ शकते. त्याची इंधन क्षमता 17 हजार किलो आहे.
 • राफेलची मारक क्षमता 3 हजार 700 किलोमीटरपर्यंत आहे तर त्याच्यावर असलेल्या स्काल्प क्षेपणास्त्राची मारक क्षमता 300 किलोमीटर आहे.
 • वेग 2,223 किलोमीटर प्रतितास आहे.
 • अँटी शिप हल्ल्यापासून ते अणुबॉम्ब हल्ल्यापर्यंत, क्लोज एअर सपोर्ट आणि लेजर डायरेक्ट लॉग्न रेंज मिसाईल हल्ल्यातही अव्वल आहे.
 • 24 हजार 500 किलोमीटरपर्यंत वजन घेऊन जाऊ शकते.
आपली प्रतिक्रिया द्या