ज्येष्ठ शिवसैनिक रघुनाथ महाडिक यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

नायगाव-वडाळा विभागातील ज्येष्ठ शिवसैनिक, उद्योजक रघुनाथ महाडिक यांचे गुरुवार 21 मार्चला अल्पशा आजाराने निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर भोईवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी  राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील विविध लोक उपस्थित होते. महाडिक यांचा दशक्रिया विधी शिवाजी पार्क येथे शनिवार, दि. 30 मार्च रोजी सकाळी 7 वाजता होणार आहे.