‘हाउडी मोदी’ वरून राहुल गांधी यांची सरकारवर टीका

1433

केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे शेअर बाजारात तेजी आली आहे. मात्र, केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली आहे. शेअर बाजारात तेजी आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकार काहीही करण्यास तयार आहेत. नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेतील ‘हाउडी मोदी’ कार्यक्रम होईपर्यंत सरकार काहीही करू शकते, असा आरोपही त्यांनी केला. मोदींच्या ‘हाउडी मोदी’ ची चर्चा सुरू आहे. मात्र, हाऊडी इंडियन इकोनॉमीचा उत्सव सुरू आहे, असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला आहे.

सरकारच्या महसूलात झालेला 1.45 लाख कोटींचा तोट्याचा संबंध त्यांनी थेट ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमाशी जोडला आहे. ‘हाउडी मोदी’ हा आतापर्यंतचा जागातील सर्वात महागडा इव्हेंट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमाची सत्यता लपवता येणार नाही. हिंदुस्थानी अर्थव्यवस्था बिकट स्थितीत असताना एवढा महागड्या कार्यक्रमाची गरज काय, असा सवालही त्यांनी केला आहे. #HowdyIndianEconomy असा हॅशटॅग बनवून त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांवर राहुल गांधी यांनी टीका केली असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयांचे स्वागत करत हे ऐतिहासिक निर्णय असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयांसाठी पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून सीतारमण यांचे कौतुक केले आहे. सीतारमण यांनी कॉरपोरेट करात सूट, कॅपिटल गेन सरचार्जमध्ये कपात यासारखे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमुळे सरकारच्या तिजोरीवर 1.45 लाख कोटींचा भार पडणार आहे. त्यावरून राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. माकपा नेते सीतारम येचुरी यांनीही सरकारने घेतलेल्या निर्णयांचा काहीही फायदा होणार नसल्याचे सांगत हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला होता. रिझर्व्ह बँकेकडून 1.76 लाख कोटी घेऊन कॉरपोरेट क्षेत्राला 1.45 लाख कोटी दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या