
‘रुपयाचे मूल्य डॉलरमागे शंभरजवळ पोहोचले आहे. इंधनांच्या किंमती वेगाने वाढत आहेत. हे येणाऱ्या महागाईचे संकेत आहेत. हे सगळे इथेच थांबणार नसून पाच राज्यांतील निवडणुका संपल्यावर पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचे दर आणखी वाढवले जातील,’ असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज ‘एक्स’ पोस्टद्वारे केला.
‘येणाऱ्या काळात उत्पादन खर्च वाढणार आहे. वाहतूक, दैनंदिन गरजेच्या वस्तू महागणार आहेत. परदेशी गुंतवणूकदार पैसा काढतील, त्यामुळे शेअर बाजारावरही परिणाम होईल. अशावेळी सरकार काय म्हणते आहे यापेक्षा सर्वसामान्यांच्या ताटात काय उरले आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे,’ असे राहुल गांधी म्हणाले.























































