मला गप्प बसवण्यासाठी खटल्यांमध्ये अडकवले जातेय!

434
rahul_gandhi

‘मला गप्प बसवण्यासाठी माझे राजकीय विरोधक जिवाचा आटापिटा करत आहेत. त्यामुळेच त्यांनी माझ्या विरोधात बदनामीचे खटले दाखल केले आहेत’ असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपवर केला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी मानहानीच्या एका खटल्यात आज सुरतच्या प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर झाले. कर्नाटकमध्ये झालेल्या एका सभेत ‘सगळय़ा चोरांची आडनावे मोदीच कशी असतात’ असे विधान त्यांनी केले होते. त्या प्रकरणी सुरतच्या न्यायालयात त्यांच्या विरोधात मोदी नावाची बदनामी केल्याप्रकरणी खटला दाखल करण्यात आला आहे.

राहुल यांनी या प्रकरणात मी दोषी नाही असे सांगत सुरत न्यायालयात खटल्याला कायमस्वरूपी उपस्थित न राहण्याचे निवेदन दिले. त्यावर पुढील सुनावणी 10 डिसेंबरला होणार आहे. काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी राहुल गांधी यांच्या विधानावर कोणतेही मत व्यक्त न करता न्यायालयाला आपले काम करू द्यावे असे म्हटले आहे. बदनामी केल्याच्या आणखी एका प्रकरणात राहुल गांधी 11 ऑक्टोबरला अहमदाबादमधील एका न्यायालयात हजर होणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या