दोन कोटी नोकर्‍यांचे दिले होते वचन, 14 कोटी झाले बेरोजगार; राहुल गांधींची टीका

689

पंतप्रधान मोदींनी दर वर्षी 2 कोटी तरुणांना रोजगार देण्याचे वचन दिले होते पण 14 कोटी लोकांचे रोजगार गेले अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच पंतप्रधान यांच्या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था रसताळाला गेली असेही राहुल गांधी म्हणाले. आज युवा काँग्रेस स्थापन दिन आहे. यानिमित्ताने ते बोलत होते.


राहुल गांधी म्हणाले की जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी दर वर्षी 2 कोटी रोजगार निर्माण होतील असे वचन दिले होते. तरुणांसाठी हे खूप मोठे स्वप्न होते. पण पंतप्रधान मोदी यांच्या चुकीच्या धोरणांमुळे 14 कोटी जणांच्या नोकर्‍या गेले आणि ते बेरोजगार झाले. तसेच मोदींनी नोटबंदी, जीएसटीची चुकीची अंमलबजावणी आणि आता लॉकडाऊन या तीन गोष्टींमुळे अर्थव्यवस्था कोलमडली असे राहुल गांधी म्हणाले. यासाठीच युथ काँग्रे रस्त्यावर उतरली आहे. या धोरणांचा विरोध करण्यासाठी युथ काँग्रेस रस्त्यावर उतरेल. बेरोजगारीचा मुद्दा उचलून सरकारला जाब विचारेल. तसेच रोजगार द्या ही मोहीमआपण सुरू केली असून जनतेने त्यात सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या