शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर नरेंद्र मोदी काहीच बोलत नाहीत, राहुल गांधी यांचे टीकास्त्र

302
rahul-gandhi

देशाच्या समस्यांवर तोडगा काढायचा सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आधी चंद्राविषयी बोलतात तर कधी जिम कॉर्बेटला जातात पण शेतकऱयांच्या आत्महत्यांविषयी आणि पीएमसी बँकेविषयी काहीच बोलत नाहीत अशा शब्दांत काँग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱयावर आले होते. सकाळी संभाजीनगरमधील औसा येथे त्यांची जाहीर सभा झाली. त्यानंतर सायंकाळी मुंबईत चांदिवली आणि धारावीत जाहीर प्रचारसभा झाली त्यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने 1 लाख 25 हजार कोटी रुपयांचा कॉर्पोरेट टॅक्स माफ केला, पण गरीबांचे किती पैसे या सरकारने माफ केले, असा प्रश्न राहुल यांनी उपस्थित केला.

चीनचा सामना करायची ताकद धारावीत

सायंकाळी राहुल गांधी यांची धारावीतही सभा झाली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, चीनचा सामना करण्याची ताकद धारावीत आहे. पंतप्रधान मोदी यांनी देशातील 15 उद्योगपतींचे कर्ज माफ केले पण धारावीतील लहान-मोठय़ा किती व्यावसायिकांचे कर्ज मोदी सरकारने माफ केले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधान मोदींनी धारावीची किंमत नाही. मेड इन धारावीशिवाय मेड इन इंडिया शक्य नाही. देशाच्या जडणघडणीत धारावीचे मोठे स्थान मोलाचे आहे अशा शब्दांत राहुल गांधी यांनी धारावीचे वर्णन केले.

आपली प्रतिक्रिया द्या