
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या कुटुंबियांची हरयाणातील करनाल येथे जाऊन भेट घेतली. त्यानंतर त्यांनी एक्स वरून याबाबत पोस्ट केली. नरवाल यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. अपार दुःखातही त्यांचा धीर साहस देशासाठी आपल्याला एकजुट राहायला हवे असा संदेश देतो, असे त्यांनी म्हटले आहे.
संपुर्ण देश शहीदांच्या कुटुंबियांसोबत उभा आहे. सरकारला विरोधकांचे पूर्ण समर्थन आहे. दोषींना अशी शिक्षा मिळावी की पुन्हा कुणीही आपल्या देशाकडे वाकडया नजरेने पाहू शकणार नाही. असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. दीड तास राहुल गांधी नरवाल यांच्या कुटुंबियांसोबत होते. यावेळी नरवाल यांची पत्नी हिमांशी उपस्थित नव्हती. ती तिच्या माहेरी गेल्याचे नरवाल यांच्या आई-वडिलांनी सांगितले.