राहुल गांधी सैन्याची बदनामी करत नव्हते, ते माजी लष्करप्रमुखांचेच लिखाण वाचत होते : प्रियांका गांधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावरून निर्माण झालेल्या वादावर काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वढेरा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, राहुल गांधी सैन्याची बदनामी करण्याचा कोणताही प्रयत्न करत नव्हते.

“राहुल गांधी हे माजी लष्करप्रमुखांच्या पुस्तकातील उतारा वाचत होते. ते स्वतः काही आरोप करत नव्हते,” असे प्रियांका गांधी यांनी सांगितले. तसेच, “जेव्हा जेव्हा सरकारला लपवायच्या गोष्टी समोर येतात, तेव्हा भारतीय जनता पक्ष नेहमीच ‘सैन्याची बदनामी’ असा आरोप करतो,” अशी टीकाही त्यांनी केली.

भाजपकडून संसदेत गोंधळ घालण्यात आल्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला असून, संसदेत तथ्य मांडण्याचा अधिकार विरोधी पक्षाला आहे, असेही प्रियांका गांधी यांनी ठामपणे सांगितले.