गायब आहे मोदी सरकार! राहुल गांधींचा ट्विटरवरून निशाणा

717

हिंदुस्थानने कोरोनाबाधितांच्या संख्येचा 20 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. कोरोनाच संकट रोखण्यात केंद्रातील भाजप सरकार अपयशी ठरताना दिसत आहे. यावरून कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी `20 लाखांचा आकडा पार, गायब आहे मोदी सरकार’ अशा शब्दात ट्विटवरून जोरदार निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी 17 जुलै रोजी एक ट्विट केले होते. त्यात त्यांनी जर याच वेगाने कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत गेला तर 10 ऑगस्टपर्यंत 20 लाखांहून अधिक लोक बाधित होतील, अशी भिती व्यक्त केली होती. ही भिती त्यापुर्वीच खरी ठरली आहे. त्यापाठोपाठ राहुल गांधी यांनी देशाची अर्थव्यवस्था खराब होण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भातील एक आलेख ट्विट करत देशातील गंभीर आर्थिक स्थितीकडे लक्ष वेधले आहे.

आरबीआयच्या ग्राहक आत्मविश्वासाच्या पाहणीचा संदर्भ देताना ते म्हणाले की, अर्थव्यवस्था आणि रोजगार आघाडीवर आणखी वाईट बातमी येऊ शकतात. वास्तविक आरबीआयने गुरुवारी जाहीर केलेल्या ग्राहक सर्वेक्षणानुसार जुलै महिन्यात ग्राहकांचा आत्मविश्वास एकदम खालच्या पातळीवर पोहोचला असल्याचे म्हटले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या