भाजपच्या कारस्थानाचा चेहरा म्हणजे नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांची टीका

चंदीगड महापौर निवडणूक चिटिंग करून जिंकल्याने भाजप गोत्यात आला. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकीत झालेल्या हेराफेरीवरून पीठासीन अधिकाऱयाला चांगलेच धारेवर धरले होते. मंगळवारी स्वत: सर्वोच्च न्यायालयाने अधिकाऱ्याने अवैध ठरवलेली मतं तपासत ती वैध ठरवली आणि भाजपला धक्का देत चंदीगडच्या महापौर पदी आपचे कुलदीप सिंग यांना विजयी घोषित केलं.

या प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि मोदींवर टीका केली आहे. लोकशाहीची हत्या करण्याच्या षडयंत्रात मसीह हा फक्त एक मोहरा (प्यादं) आहे, तर या मागचा चेहरा हा नरेंद्र मोदी आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. एक्स या सोशल मीडियावरून त्यांनी ही टीका केली आहे.