सत्याला घाबरून असत्याचा आधार; त्यांना जे योग्य वाटले ते त्यांनी केले! राहुल गांधी यांचा मोदींना टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीनची घुसखोरी, हिंदुस्थान-अमेरिकेतील मुक्त व्यापार करार आणि ‘एपस्टिन फाइल्स’वर विरोधक पहिल्या दिवसापासून प्रश्न विचारत आहेत. मात्र पंतप्रधान मोदींनी त्यावर उत्तर दिलेले नाही. उलट लोकसभेत येणे टाळले. तर, राज्यसभेतील भाषणात त्यांनी पंडित नेहरू, इंदिरा गांधींवर टीका केली. याचा राहुल गांधी यांनी आज समाचार घेतला. ‘फक्त प्रश्न विचारले म्हणून इतकी भीती? मोदीजी सत्याला इतके घाबरले की त्यांनी असत्याचा आधार घेतला. असो. त्यांना जे योग्य वाटले ते त्यांनी केले,’ असा टोला राहुल गांधी यांनी नरवणे यांच्या पुस्तकातील मोदींच्याच वाक्याचा आधार घेऊन हाणला.