Pahalagam Terror Attack – राहुल गांधी यांचा अमित शहा यांना फोन, पहलगाम हल्ल्यावर केली चर्चा

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवरून चर्चा केली. राहुल गांधींनी स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती दिली.

X वर पोस्ट करत राहुल गांधी म्हणाले आहेत की, “पर्यटकांची अशी क्रूर हत्या आणि त्यापैकी काहींना जखमी करणे, ही हृदयद्रावक आणि अत्यंत निंदनीय घटना आहे. मी शोकाकुल कुटुंबांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो आणि जखमींना लवकर आराम पडो, अशी प्रार्थना करतो. अशा भ्याड हल्ल्यांचा केवळ निषेध केला जाणार नाही तर, चोख प्रत्युत्तर देऊन आपल्या सीमांचं आणि नागरिकांचं रक्षण केलं जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करतो.”

आणखीन एका पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले आहेत की, “पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याबद्दल गृहमंत्री अमित शहा, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष तारिक कर्रा यांच्याशी संवाद साधता. सध्याच्या परिस्थितीची माहिती जाणून घेतली.”