जम्मू-काश्मीरशी माझं जुनं आणि रक्ताचं नातं; राहुल गांधी यांचं श्रीनगरमध्ये मोठं विधान

जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे दोन दिवसांचा जम्मू-काश्मीरच्या दैऱ्यावर आहेत. राहुल गांधी यांनी गुरुवारी श्रीनगर येथील कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यावेळी ते म्हणाले, जम्मूतील लोक ज्या भीतीने जगतात ती भीती मुळासकरट काढून टाकायची आहे. आम्ही प्रेमाने द्वेशाला जिंकू, असे राहुल गांधी म्हणाले.

जम्मू काश्मीरच्या लोकांवर माझं प्रेम आहे. हे नातं फार जुनं आहे, रक्ताचं नातं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसने निडरपणे काम केलेले आहे. नॅशनल कॉन्फरन्ससोबत युती होईल पण काँग्रेस कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होणार नाही, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. वेगवेगळ्या राज्यांमध्ये निवडणुकांचे बिगुल वाजले असताना मी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली आणि त्यानंतर आम्ही सर्वात आधी जम्मू काश्मिरला जायला हवे, असा निर्णय घेतला. आम्ही देशाच्या जनतेला संदेश देऊ इच्छित आहोत की, आमच्यासाठी जम्मू काश्मीरमधील लोकांचे प्रतिनिधित्व सगळ्यात महत्त्वाचे आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

द्वेषाचा पराभव प्रेमानेच होऊ शकतो. द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडायचे आहे आणि प्रेमाने द्वेषाचा पराभव करू, असा संदेश राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला.