बेपत्ता चिदंबरम यांच्या बचावासाठी राहुल मैदानात, सरकारवर गंभीर आरोप

581

आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लॉण्डरिंगप्रकरणी दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यापासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी अर्धमंत्री पी. चिदंबरम बेपत्ता आहे. बेपत्ता चिदंबरम यांच्या बचावासाठी आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी मैदानात उतरले आहेत. राहुल यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

राहुल गांधी ट्वीट करून मोदी सरकारवर आरोप केला आहे. ‘मोदी सरकार ईडी, सीबीआय आणि प्रसारमाध्यमांचा चुकीचा वापर करून पी. चिदंबरम यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे. मोदी सरकारकडून सत्तेचा चुकीचा वापर सुरू असून मी याचा निषेध करतो’, असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले.

प्रियंका गांधींचे ट्वीट
राहुल गांधी यांच्याआधी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंगा गांधी वढेरा यांनी ट्वीट करून पी. चिदंबरम यांची पाठराखन केली. पी. चिदंबरम यांच्या पाठीशी आम्ही उभे असून सत्यासाठी नेहमची लढाई सुरु ठेऊ, असे प्रियंका गांधी म्हणाल्या. यावेळी प्रियंका यांनी चिदंबरम यांनी मंत्रिपदावर असताना केलेल्या कामांची प्रशांसा केली.

काय आहे प्रकरण?
आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लॉण्डरिंगप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्याविरोधात सर्वोच्च न्याययालयात धाव घेणाऱ्या चिदंबरम यांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने देखील उच्च न्यायालच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला असून सरन्यायाधीशांकडे प्रकरण सोपवण्यात आले आहे. त्यामुळे चिदंबरम यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या