राहुल गांधींची 17 ऑगस्टपासून ‘मतदान अधिकार यात्रा’, 16 दिवस करणार बिहारमध्ये प्रवास

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची ‘मतदान अधिकार यात्रा’ बिहारमधील सासाराम येथून 17 ऑगस्टपासून सुरू होत. या यात्रेत राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवही सहभागी होणार आहेत. या यात्रेचा अररिया येथे समारोप होईल.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांची ही यात्रा सकाळी 8 वाजता शेखपुरा येथील तीन मोहनी दुर्गा मंदिर येथून सुरू होईल. ही 1,300 किमी लांबीची यात्रा बिहारमधील 25 जिल्ह्यांमधून जाईल आणि 16 दिवस चालेल. या यात्रेत इंडिया आघाडीचे सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत

याबद्दल माहिती देताना काँग्रेस प्रभारी कृष्णा अल्लावरू म्हणाले की, राहुल गांधी देशातील मताधिकार मजबूत करण्यासाठी निघाले आहेत. ते देशाचे संविधान, लोकशाही आणि मतदारांना बळकट करण्यासाठी बिहारमध्ये येत आहेत. राहुल गांधी बिहार आणि देशाचे भविष्य बळकट करण्यासाठी मतदार हक्क यात्रेला निघाले आहेत. बिहारमधील मतदार यादीतील दुरुस्तीविरुद्ध आणि मत चोरीविरुद्धच्या लढाईला जनआंदोलन बनवण्यासाठी ही यात्रा काढली जात आहे.