ही तर मढ्यावरचं लोणी खाण्याची प्रवृत्ती, राहुल शेवाळे यांची भाजपवर टीका

1500

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धारावीचे श्रेय एकट्या राज्य सरकारला घेता येणार नाही असे वक्तव्य केले होते. याला शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी जोरदार प्रत्यत्तर देत धारावी पॅटर्नच्या यशाचे श्रेय घेण्याचा भाजपाचा प्रयत्न म्हणजे मढ्यावरचं लोणी खाण्याची निलाजरी प्रवृत्ती असल्याची जळजळीत टीका केली.

आरएसएसच्या स्वयंसेवकांनी धारावीत जाऊन जीव धोक्यात घातल्यामुळेच हे घडले असल्याच्या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर राहुल शेवाळे म्हणाले की, धारावीतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्यक्ष कोणी किती मेहनत घेतली, याची साक्ष धारावीतील जनताच देईल. मोठेपणा हा मागून मिळत नाही, तो कमवावा लागतो. उगीच नको त्या विषयात राजकारण करून जनतेच्या भावनांचा अनादर करणे विरोधकांना महागात पडेल. अशा कठीण प्रसंगात दिवसरात्र सरकारवर टीका करायची आणि चांगल्या कामगिरीच्या श्रेयासाठी रेटून खोटं बोलायचं, ही दुटप्पी भूमिका असल्याचे शेवाळे यांनी म्हटले.

आपली प्रतिक्रिया द्या