अलीबागमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न

सामना ऑलनाईन । रायगड

रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे.  पाचही जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील दोन लहान मुलांची प्रकृती चिंताजनक आहे. रामचंद्र पाटील (वय ६०), रंजना पाटील (वय ५०), कविता राहुल पाटील पाटील (वय २५), स्वराली पाटील (दीड वर्षे)  आणि स्वराज पाटील (दीड वर्षे)  अशी त्यांची नावे आहेत.

अलिबाग तालुक्यातील आक्षी येथे राहणाऱ्या एकाच कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांनी शितपेयातून विष घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. आजी- आजोबा, सूनबाई आणि त्यांची दीड वर्षांची जुळी मुले अशा पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, एकाच कुटुंबातील सदस्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला या मागील कारणाचा अद्याप उलगडा झालेला नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.