
रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी विकासकामे करणाऱ्या कंत्राटदारांची सुमारे तीन हजार कोटी रुपयांची बिले सरकारने थकवली आहेत. त्यामुळे या कंत्राटदारांच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे. आमची थकीत देयके तातडीने मिळावीत अशी मागणी या कंत्राटदारांनी रायगडचे जिल्हाधिकारी किशनराव जावळे यांच्याकडे केली आहे.
राज्यातील सर्व विभागात काम करणारे कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, हॉट मिक्सधारक कंत्राटदार, मजूर संस्था आणि विकासक यांची 89 हजार कोटींची देयके रखडली आहेत. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील तीन हजार कोटींच्या देयकांचा समावेश आहे. इतक्या मोठ्या संख्येने देयके थकल्यामुळे कंत्राटदार हैराण झाले असून अनेक ठिकाणी कामांचीही रखडपट्टी झाली आहे. ही रखडलेली देयके तातडीने द्यावी अशी मागणी कंत्राटदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पालरेचा, कर्जतचे वीरेंद्र जाधव, अलिबागचे पिंटू ठाकूर, काका ठाकूर, पेणचे संतोष पाटील, राजेश पाटील, महाडचे तेजस निकम, पालीचे मिलिंद ठोंबरे, विराज मेहता यांच्यासह सुमारे 300 कंत्राटदार उपस्थित होते.
दखलच घेतली जात नाही
विकासकामांची राज्य सरकारकडे थकलेली मिळावीत यासाठी मागणी केली आहे. आंदोलनही छेडले मागणीची आणि दखल प्रशासकीय नाही अशी खंत केली आहे. देयके तातडीने कंत्राटदारांनी वारंवार धरणे आणि उपोषण आहे. मात्र या आंदोलनाची कोणतीही अधिकाऱ्यांनी घेतलेली कंत्राटदारांनी व्यक्त
वर्षभरापूर्वी केली आहेत कामे
तीन हजार कोटी रुपयांची देयके थकलेल्या ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग, नगरविकास, जलसंधारण व जलसंपदा विभाग, जल जीवन मिशन विभागातील कामे केली आहेत. ही कामे जवळपास वर्षभरापूर्वी पूर्ण झाली आहेत. या कामांची देयके मिळत नसल्याने त्याचा अन्य कामांवरही परिणाम झाला आहे. ठेकेदारांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे.