महत्त्वाची बातमी! रायगड किल्ल्यावरील रोप वे सात दिवस बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Raigad Fort ropeway services to remain closed for seven days from February 23 to 28 due to annual technical maintenance and repairs.

येत्या 23 ते 28 फेब्रुवारी दरम्यान या कालावधीत रायगड किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांनी रोप-वे सेवेचा वापर न करण्याचे आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

रायगड किल्ल्यावर जाणाऱ्या रोप-वेच्या तांत्रिक देखभाल व आवश्यक दुरुस्तीची कामे येत्या 23 ते 28 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. त्यामुळे या कालावधीत रोप वेची सेवा सात दिवस पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. दरवर्षी रोप-वेची तांत्रिक तपासणी, देखभाल तसेच आवश्यक दुरुस्तीची कामे केली जातात. यंदाही ही दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे या कालावधीत रायगड किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांनी रोप-वे सेवेचा वापर न करण्याचे आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.