राष्ट्रवादीची गळती थांबेना, आणखी दोघांचा पक्षाला रामराम

3704

रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती थांबायचं नाव घेत नाही. राष्ट्रवादीचे अलिबाग तालुका अध्यक्ष मनोज धुमाळ आणि जिल्हा सल्लागार प्रकाश धुमाळ या दोघा बापलेकानी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आहे.

लोकसभा निवडणूक निकालानंतर मनोज धुमाळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार अशी चर्चा सुरू होती. मात्र काही दिवस त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली होती. आज अखेर मनोज व प्रकाश धुमाळ या दोघांनीही आपल्या पदाचा व पक्ष सदस्यत्वचा राजीनामा सुनील तटकरे तसेच जिल्हाध्यक्ष दत्ताजी मसुरकर यांच्याकडे पाठवून दिला आहे.

आघाडीचा धर्म पाळताना अलिबाग तालुक्यात पक्षवाढीसाठी पक्ष श्रेष्टींकडून कोणतेही प्रयत्न झालेले दिसत नाही. त्यामुळे पक्षात राहून काम करणे शक्य नाही अशावेळी पक्षातील मानाचे स्थान अडवून ठेवणे आपल्या तत्वात बसत नसल्याने आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे मनोज धुमाळ यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे. दुसरीकडे प्रकाश धुमाळ यांनीदेखील पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. प्रकाश धुमाळ हे रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या