
बाप्पाच्या आगमनाला अवघा एक महिना राहिला असल्याने कला केंद्रांमध्ये मूर्ती बनवण्यासाठी युद्धपातळीवर लगबग सुरू आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रायगडातील गणेश मूर्तिकारांसमोर काम करताना ‘विघ्न’ येत आहे. मुरुड, तळा तालुक्यात सर्वात जास्त वीजपुरवठा खंडित होत असून लाईट नसल्याने मूर्ती सुकवणे तसेच रंगकाम करायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे.
रायगड जिल्ह्यात पेण हे गणेशमूर्ती कारखानदारांचे प्रमुख केंद्र आहे. या ठिकाणाहून संपूर्ण राज्यासह देश- विदेशात बाप्पाची निर्यात केली जाते. मात्र पेणबरोबरच जिल्ह्यातील अन्य तालुक्यांतही लहान-मोठ्या गणेशमूर्ती बनवण्याचे कलाकेंद्र असून या ठिकाणी मे महिन्यापासूनच मूर्ती बनवण्याची लगबग सुरू आहे. परंतु जुलै महिन्यातील धो धो पावसामुळे पोलादपूरसह मुरड, तळा तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे.
असल्याने याचा जबरदस्त फटका मूर्तिकारांना बसला आहे. गणेशोत्सव अवघा एक महिन्यावर आल्याने मूर्ती सुकवणे, रंगकाम यांसारखी कामे रखडली आहेत. याबाबत वारंवार महावितरण अधिकाऱ्यांनी तक्रारी करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने संताप व्यक्त होत
महावितरण अधिकाऱ्यांना घेराव
वारंवार तक्रार करूनही महावितरण अधिकारी कानाडोळा करत असल्याने मूर्तिकार मेटाकुटीला आले आहेत. याबाबत आज तालुक्यातील मूर्तिकारांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना घेराव घातला. तसेच तत्काळ वीजपुरवठा सुरळीत करा, अशी मागणी केली. यावेळी तालुका गणेश मूर्तिकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत सुर्वे, सचिव संदीप मोकल, महेश साळुंखे, अच्युत चव्हाण उपस्थित होते.