
रेल कामगार सेना-महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना युतीने मध्य रेल्वे मुंबई विभागातील इन्स्टिटय़ूट निवडणुकांमध्ये सलग दुसरा दमदार विजय मिळवत प्रस्थापित गटांना धक्का दिला आहे. भायखळ्यापाठोपाठ परळच्या मेकॅनिकल इन्स्टिटय़ूटवर भगवा फडकवण्यात रेल कामगार सेना-मनसे युतीने यश मिळवले. भायखळा इन्स्टिटय़ूटमध्ये रेल कामगार सेनेचे स्वतंत्र पॅनल विजयी झाल्यानंतर परळ इन्स्टिटय़ूटमध्ये परिवर्तन पॅनलला प्रचंड बहुमत मिळाले.
रेल कामगार सेनेचे अध्यक्ष विनायक राऊत यांच्या आदेशानुसार कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस दिवाकर देव (बाबी) आणि रनिंग ब्रॅंचप्रमुख प्रशांत कमानकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली निवडणुकीत रेल कामगार सेनेने दबदबा कायम राखला. परळ मेपॅनिकल इन्स्टिटय़ूटच्या निवडणुकीत रेल कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना युतीने ‘सीआरएमएस’ संघटनेला बरोबर घेऊन परिवर्तन करण्यासाठी निवडणूक लढवली. कामगारांनी या परिवर्तनाच्या भूमिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी केले. परळ इन्स्टिटय़ूटच्या निवडणुकीत सचिव म्हणून लहू थळे, खजिनदार – दिनेश महाले, तर सदस्य म्हणून भूषण भुरे, प्रथमेश म्हात्रे, रितेश बडगुजर, सतीश साळवी, अक्षय तांबे, राम सुभमल्ला, अशोक घाग हे उमेदवार निवडून आले.
ऐतिहासिक विजय मिळवण्यासाठी रेल कामगार सेनेचे केंद्रीय पदाधिकारी सहकार्याध्यक्ष आदित्य सातोसे, महिला आघाडी सरचिटणीस सोनाक्षी मोरे, विजय सितप, सुषमा गुजर, लजेश कोरगावकर, स्वप्नील मयेकर, आशुतोष शुक्ला, संतोष शेलार, राजेश भगत, तिरुमलेश अंबाला, नरेश म्हेत्रे, हिरेन अंजार, दिनेश हलाले आदी रेल कामगार सेनेच्या पदाधिकाऱयांनी विशेष मेहनत घेतली. तसेच परळ युनिटचे अध्यक्ष रवींद्र धुरी, सेव्रेटरी आशीष माळवे, खजिनदार शैलेंद्र रसाळ, संदेश कदम, राहुल राणे, बाळू किरवे, अशोक नाले, पुरण शेट्टी, पंकज शिंदे, सुशांत जाधव, अंबुज यादव, कमलेश पैलबाईकर, अमोल कासार, आय.बी. यादव, अभिजीत रणदिवे, कोमल माळवे, भाग्यश्री हळदणकर, निशा भालेराव, सुरेखा गायकवाड हे पदाधिकारी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, मुंबई विभाग अध्यक्ष प्रवीण निंबाळकर, काशिनाथ बल्लाळ, रमेश आरकडे, फुलाजी भोईर, हरवंश सिमरिया, अक्षय जाधव, सनी चिपळूणकर, विजय पांडे, सिद्धार्थ ओव्हाळ, महिला अध्यक्ष मोहिनी तावडे, सरोजा चलन, संगीता जयस्वार, वेदश्री साळुंखे आदींनी परिश्रम घेतले. सीआरएमएसचे अध्यक्ष बी. विश्वराजन, विशाल साळुंखे, संदेश धुरे भूमिका महत्त्वपूर्ण ठरली.

























































