रेल्वेत बंपर भरती केली जाणार असून तब्बल 14,298 पदे भरण्यातयेणार आहेत. त्यासाठी 2 ऑक्टोबरपासून अर्ज करता येणार आहे. या नोकरीसाठी 90 हजारांहून अधिक पगार मिळणार आहे. आरआरबीने रेल्वेत टेक्नीशियन्सची भरती करण्याच्या दृष्टीने अर्जप्रक्रिया राबवण्यासाठी अधिसूचनाही जारी केली आहे. इच्छुक उमेदवारांना आरआरबीचे अधिकृत संकेतस्थळ rRcdg.gov.in वर जाऊन अर्ज करता येणार आहे. ज्यांनी यापुर्वीच अर्ज केला आहे त्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. याआधी झालेल्या भरतीसाठी 9 मार्च 2024 ते 8 एप्रिल 2024 पर्यंत अर्जप्रक्रीया राबवण्यात आली होती. 9144 पदांसाठी ही भरती होती.
अर्ज करण्यासाठी काय करावे लागेल?
उमेदवारांना 500 रुपयांचे शुल्क भरावे लागेल. यातील 400 रुपये सीबीएटी अर्थात कॉम्प्युटर बेस ऑप्टिटय़ुड टेस्टनंतर परत करण्यात येतील. आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना 250 रुपये शुल्क द्यावे लागेल. सीबीएटी टेस्टनंतर हे शुल्क परत करण्यात येईल. सुरुवातीला सीबीटी परीक्षा होईल. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी होईल आणि मग वैद्यकीय चाचणी होईल. निवड झाल्यानंतर पदानुसार महिन्याला 19,900 ते 92,300 रुपये पगार देण्यात येईल.