
रेल्वेची संगणकीय आरक्षण सेवा रविवारी मध्यरात्रीपासून पाच तासांसाठी बंद राहणार आहे. यंत्रणेतील अद्ययावतीकरण करण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.
सध्या रेल्वेच्या तिकिटाचे बहुतांशी आरक्षण ऑनलाईन होते. चोवीस तास सुरू असलेल्या या ऑनलाईन सेवेचा देशभरातील लाखो प्रवासी याचा लाभ घेतात. मात्र ऑनलाईन यंत्रणेत काही तांत्रिक सुधारणा करण्यासाठी रविवारी रात्री 11.45 ते सोमवारी पहाटेपर्यंत सदर सेवा आरक्षण सेवा बंद असणार आहे.























































