कोरोनामुळे रेल्वेचा मोठा निर्णय, नवीन पदांची भरती रद्द

1302

कोरोना संकटाच्यावेळी रेल्वेने आर्थिक आघाडीवर मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेने नवीन पदांची भरती प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. गेल्या दोन वर्षात तयार केलेल्या नवीन पदांचा आढावा घेतला जाईल तसेच 50% पोस्टही सरेंडर केल्या जातील.

रेल्वे बोर्ड, रेल्वे मंत्रालय आणि हिंदुस्थान सरकार यांनी जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, पुढील आदेश येईपर्यंत नवीन पदांसाठी भरती करण्यावर रोख लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, सुरक्षेशी निगडित पदांना यातून सूट देण्यात आली आहे.

रेल्वे बोर्ड गेल्या दोन वर्षात तयार केलेल्या पदांचा आढावा घेईल. जर अद्याप या पदांसाठी भरती झालेली नसेल तर एकतर संपूर्ण रिक्त जागा रद्द करण्यात येतील किंवा सुरक्षेशी संबंधित पदे वगळून केवळ 50 टक्के पदे भरली जातील.

कोरोना लॉकडाऊनमुळे रेल्वेचं मोठं नुकसान झालं आहे. 25 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन आहे. दोन महिन्यांपासून ऑपरेशन्स पूर्णपणे बंद आहेत. मेच्या दुसर्‍या आठवड्यात स्पेशल ट्रेन म्हणून काही गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. दरम्यान, 12 ऑगस्टपर्यंत नियमित गाड्या चालवल्या जाणार नाहीत, अशी घोषणा रेल्वेने केली होती. बऱ्याच दिवसांपासून कामकाज बंद ठेवल्यामुळे रेल्वेला हजारो कोटींचे नुकसान झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या